Uddhav Thackery interview : उद्धव ठाकरेंचा ‘तो’ एकच प्रश्न, एकनाथ शिंदे सुद्धा देऊ शकणार नाही उत्तर!

uddhav Thackery
Caption:Twitter/@rautsanjay61

मुंबई, 26 जुलै : Uddhav Thakrey -‘बाळासाहेबांची शिवसेना ही रस्त्यावरची व कायद्याची लढाई नक्कीच जिंकेल, ज्या आमदार खासदार व नेत्यांनी शिवसेनेला धोका दिलाय शिवसेनेचा विश्वासघात केलाय पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावे.

तुम्हाला हे पहायला आवडेल:- Top 10 Best Marathi Web Series-! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Celebrating Kargil Diwas 2022: India Pays Tribute To The Kargil War Heroes
बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये खूपच मोठी हालचाल झालेली आहे, एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार सथापन केले आहे. या सर्व घटनेनंतर माजी मुख्यमंत्री Uddhav Thackery यांनी पहिल्यांदाच आपल्या इंटरव्यू मध्ये आपली रोखठोक बाजू मांडली आहे. या मुलाखतीमध्ये Uddhav Thackery यांनी एकनाथ शिंदे व जे बंडखोर आमदार आहेत त्यांना सरळ प्रश्न विचारला आहे.पण या प्रश्नाचे उत्तर कुठलाच बंडखोर् आमदार देऊ शकत नाही.

uddhav Thackery
Google-Image-Credit-lokmat.news18.com
ज्यांच्यावर आम्ही आपला समजून विश्वास टाकला त्यांनीच आमचा विश्वासघात केलाय, तेच लोक आता आम्ही हिंदुत्व सोडले आहे असे बोलून बाहेर जाऊन बोंबा मारत आहेत त्या लोकांना मला हा एकच प्रश्न विचारायचा आहे की 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होत?
जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली होती, तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की शिवसेना आता संपेल पण त्यावेळी शिवसेना एकटी लढली आणि 63 आमदार निवडून आले.त्या काळात विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्यावर आली होती, तेव्हा मी पद कोणाला दिलं होतं असा सरळ प्रश्न Uddhav Thackery यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

uddhav Thackery
Google-Image-Credit-https://geotvnews.com/

Uddhav Thackery साहेब पुढे म्हणाले की:-
ज्यांचे आई वडील सुदैवाने जिवंत आहेत त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने काम करावे माझे वडील का चोरताय्? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तुत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये, तुम्ही मर्द नाहीत तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वातघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्द चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मत असा थेट चॅलेंज Uddhav Thackery  यांनी एकनाथ शिंदे गटाला दिल आहे.
                                                           

Previous articleविपक्ष की Venkaiah Naidu से मांग – नियम 267 पर चर्चा हो
Next article84 वर्षीय यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) किसी अन्य राजनीतिक दल में शामिल नहीं होना चाहते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here